सर्वसामान्याच्या खिशाला कात्री: बटाटा-कांद्यानंतर खाद्यतेलाच्या किंमतीही वाढल्या

0
271

दिल्ली, दि.१२ (पीसीबी) : बाजारात बटाट्याची नवीन आवक झाल्याने बटाट्याची किंमत नियंत्रणात येऊ लागली आहे. गेल्या पाच दिवसांत बटाट्याचा दर 40 रुपयांवर आला आहे. त्याचबरोबर कांद्याचे दरही घटू लागले आहेत. तथापि, तेलाच्या किंमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातील बजेट पुन्हा बिघडले आहे. सर्व खाद्य तेल, शेंगदाणा, मोहरी तेल, वनस्पती, सोयाबीन, सूर्यफूल आणि पाम आदी तेलाच्या सरासरी किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. खाद्य तेलाचे वाढते दर सरकारसाठी चिंतेचे कारण बनत आहे.
गेल्या 5 दिवसात तेलाच्या किंमती एवढ्या वाढल्या

ग्राहक मंत्रालयाच्या संकेतस्थळावर दिलेल्या आकडेवारीनुसार, 6 डिसेंबरपासून देशातील किरकोळ बाजारात खाद्यतेलांच्या किमतींमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली आहे. यामध्ये पाम तेलाचे दर 100 वरून 109 रुपये, सूर्यफूल तेल 123 वरून 127 रुपये आणि मोहरी तेल 133 रुपयांवरून 137 रुपये प्रति लीटरपर्यंत पोहोचले आहेत. पण शेंगदाणा तेलाच्या किंमती मात्र अडीच टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.