धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंना भावनिक साद

0
213

बीड, दि. २ (पीसीबी) : राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे आणि संबंध संबंधांच्या ठिकाणी आहेत. यापूर्वी राजकारणामध्ये कडवटपणा होता. तो कडवटपणा तसाच राहील. पण कुठे तरी आता घरात संवाद राहिला पाहिजे. त्या मताचा मी आहे, असं म्हणत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी एक प्रकारे भाजप नेत्या पंकजा मुंडेंना साद घातली.

गोपीनाथ गडावर नतमस्तक होऊन धनंजय मुंडे परळीला जात असताना त्यांनी मीडिया शोभत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते .. ज्या व्यक्तीसोबत मी राजकारणाची सुरुवात केली. विद्यार्थी दशेपासून सावलीसारखा आप्पांच्या सोबत राहिलो. 5 वर्षांची सत्ता सोडता मुंडे साहेबांचा काळ विरोधात गेला. स्वाभाविक कुठल्याही प्रश्नावर ते संघर्षाचा लढा उभा करायचे. कुठलाही प्रश्न ते संघर्षातून सोडवण्यासाठी पाठपुरावा करायचे. जेणेकरून सत्ताधाऱ्यांना हा प्रश्न सोडवण्याचा विचार करावाच लागायचा. अशा सर्व गोष्टींच्या शिकवणीची आजही आम्हाला आठवण होत असल्याचं सांगत धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला.