संयुक्त राष्ट्र संघाच्या महिला सबलीकरण आयोगाच्या 68 व्या परिषदेसाठी डॉ.गणेश अंबिके यांची निवड

0
135

पिंपरी, दि. ०७ (पीसीबी) – संयुक्त राष्ट्र संघाच्या महिला सबलीकरणासाठी आयोगाच्या 68 व्या परिषदेसाठी पिंपरी चिंचवड मधील मोरया सामाजिक प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ.गणेश माधवराव अंबिके यांची पॉलिसी अँड इकनॉमिक अलायंस केयरिंग ऑफ अर्थ या संयुक्त राष्ट्र संघाच्या सल्लागार दर्जा असलेल्या संस्थेच्या वतीने निवड करण्यात आली आहे.

ही परिषद दि.11 मार्च ते 22 मार्च 2024 रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या न्यूयॉर्क येथील मुख्य कार्यालयात होत आहे. पॉलिसी अँड इकॉनॉमीक अलायंस केयरिंग ऑफ अर्थ या संस्थेवर डॉ. गणेश माधवराव अंबिके यांची नुकतीच संचालक म्हणुन निवड झाली आहे. संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर 137 देशांमधे कार्यरत असून महिला सबलीकरण, उद्योग, व्यवसाय अशा अनेक विषयावर काम करते.

संयुक्त राष्ट्र संघाच्या महिला सबलीकरण आयोगाच्या 68 व्या परिषदेमध्ये लिंग समानता,महिला आणि मुलींचे सक्षमीकरण, गरिबी दूर करने, महिला रोजगार या व महिलांसंबंधित अनेक विषयावर अनेक देशांच्या वतीने तसेच संयुक्त राष्ट्र संघाच्या अनेक संस्थान मार्फत तसेच अनेक स्वयंसेवी संस्थान मार्फत अनेक तज्ज्ञ व्याख्याते मंत्री-परिषदेतील सदस्य जागतिक नेते हे चर्चा करून अनेक मीटिंग द्वारे मार्ग काढून परिषदेचा उद्देश साध्य करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जाणार आहे. त्या सोबत या विषयांवर काम करणार्‍या संस्थाना, संघटनांना संघटित करून सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

डॉ. गणेश अंबिके हे त्यांच्या आंतर्राष्ट्रीय व संयुक्त राष्ट्र संघातील अनुभव या महत्वपूर्ण 68 व्या परिषदेसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. ते संयुक्त राष्ट्र संघाच्या आयोजित परिषदेमध्ये अनेक चर्चा सत्रामध्ये सहभाग घेऊन महिलांसाठी कौशल्य विकास रोजगार तसेच आर्थिक स्थिति सुधारण्यासाठी आवश्यक उपाय योजना या विषयांवर तज्ज्ञ संचालक म्हणुन मते मांडणार आहेत.