संपर्कात असलेल्या राष्ट्रवादीच्या एकातरी आमदाराचे नांव सांगा; अजित पवारांचे आंबेडकरांना आव्हान  

0
619

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – खरोखरच आमचे आमदार संपर्कात असतील, तर त्यांनी एकातरी आमदारांचे नाव सांगावे, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. यावर अजितदादा यांनी आंबेडकर यांना त्या आमदारांची नांवे जाहीर करण्याचे आव्हान केले आहे.  पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने दुष्काळाच्या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी अजित पवार म्हणाले की, आमदार संपर्कात असल्याचा आंबेडकरांचा दावा धादांत खोटा आहे. त्यांच्या सोबत कशाला आमचे आमदार जातील. याला काडीचाही आधार नाही. त्याचा हा दावा धादांत खोटा आहे.

दरम्यान, विधानसभेसाठी आघाडी करण्यापेक्षा स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी प्रकाश आंबेडकर यांनी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यामुळे राज्याचा राजकारणात खळबळ उडाली आहे.