संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने लोणावळा, खंडाळा येथे बुधवारी स्वच्छता अभियान  

0
772

भोसरी, दि. ३ (पीसीबी) – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने  देशातील ९ राज्यांमधील १७  थंड हवेच्या ठिकाणी विशाल स्वच्छता त्याचबरोबर वृक्षारोपण अभियान बुधवारी (दि.५)  राबवले जाणार आहे. जागतिक तापमानवाढीमुळे  पृथ्वीवर निर्माण झालेल्या पर्यावरणविषयक समस्यांबाबत या अभियानाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.

या १७ ठिकाणांमध्ये पुणे जिल्ह्यातील लोणावळा, खंडाळा या ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. या अभियानांमध्ये संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन चे हजारो स्वयंसेवक, सेवादल, अन्य श्रद्धाळू भक्त, स्थानिक नगरपरिषद (लोणावळा) योगदान देणार आहेत.याचबरोबर महाराष्ट्रातून महाबळेश्वर, पाचगणी आणि पन्हाळा येथे याच पद्धतीने अभियान राबविण्यात येणार आहे.

अभियानाच्या ठिकाणी सकाळी ७:३० वाजता  स्वयंस्फूर्तीने सेवा करणारे सदस्य एकत्रित होतील, दुपारी १२:३० वाजता पर्यंत हे अभियान चालेल.फाऊंडेशन चे युवा कलाकार पथनाट्य,बॅनर तसेच नागरिकांबरोबर संवाद साधून समाजामध्ये जागरूकता निर्माण करतील. त्याच बरोबर १२ वाजल्यापासून सायकल रॅलीच्या माध्यमातून बाजारपेठ परिसरामध्ये जनजागृती करतील.

या  स्वच्छता अभियानामध्ये  नागरिकांनी  सहभागी होऊन आपला देश, आपले पुणे स्वच्छ करून रोगराई  मुक्त करूया, असे आवाहन पुणे जिल्हा संत निरंकारी मंडळाचे झोनल इंचार्ज ताराचंद करमचंदानी यांनी  केले आहे.