संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत “एवढ्या” दिवसांची वाढ

0
252

मुंबई,दि.०२(पीसीबी) – शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टाने संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे. आता त्यांच्या जामीन याचिकेवर ९ नोव्हेंबरला निकाल दिला जाणार आहे.

संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत याआधीही वाढ करण्यात आली. २१ ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीत त्यांच्या न्यायालयीन कोठडीत २ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली होती. त्यामुळे दसऱ्या पाठोपाठ संजय राऊत यांची दिवाळीही तुरुंगातच गेली.

गोरेगाव येथील कथित पत्रा चाळ जमीन गैरव्यवहारप्रकरणी ईडीने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली होती. त्यानंतर संजय राऊतांनी जामीन मिळावा यासाठी, न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर २१ ऑक्टोबरला सुनावणी पार पडली. मात्र, न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलत २ नोव्हेंबरला ठेवली. आता पुन्हा या जामीन याचिकेची सुनावणी ९ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली.