श्री आनंदमूर्तीस्वामी ब्रह्मनाळकर यांची बखर

0
397

पिंपरी, दि.०७ (पीसीबी) : श्रीदासपंचायतनामधील एक महासाधू श्री आनंदमूर्ती व त्यांचे परमगुरू श्री रघुनाथस्वामी यांचे जागृत • संतपीठ ब्रह्मनाळ (ता. पलूस, जि. सांगली) येथे विद्यमान आहे व ते सर्वज्ञात आहे. ‘श्री आनंदमूर्ती स्वामी, ब्रह्मनाळकर यांची बखर’ या नावाचा, श्री आनंदमूर्ती यांचा मृतेतिहास, इ.स. 1716चे दरम्यान, ब्रह्मनाळ येथील मठामधे लिहिला आहे. हे चरित्र अनेक लोकोत्तर अशा घटनांनी भरलेले आहे. त्यावेळच्या परिपाठाप्रमाणे हे चरित्र मोडी लिपीमधे असल्याने सर्वसामान्य भक्तांना समजण्यास अवघड , किंबहुना अशक्यच आहे.

या वस्तुस्थितीचा विचार करून श्री. दत्तात्रेय अनंत उपाध्ये यांनी त्याचे देवनागरी लिपीमध्ये रूपांतर करून ते प्रकाशित केले आहे. जिज्ञासूंसाठी यामये गूळ मोडी लिपीमधील बखरी अंतर्गत केली आहे. या संचाची सविस्तर माहिती सोबत जोडलेल्या प्रस्तावनेगये दिलेली आहे. हा ग्रंथ नाळ येथील मठामध्ये व श्री. उपाध्ये यांचेकडे ऐच्छिक मूल्यावर उपलब्ध आहे. भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती श्री. उपाध्ये यांनी केली आहे.
त्यांचा संपर्क टू. ध्व. क्रमांक- 9921633413/