शुल्लक कारणावरून सख्ख्या भावानेच भावाला भोकसून खून

0
659

नागपूर, दि.४ (पीसीबी) – शुल्लक कारणावरून सख्ख्या भावानेच भावाला भोकसून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना नागपुरातील प्रतापनगर पोलीस ठाण्यांतर्गत सिंधी कॉलनी परिसरात घडली.

चेतन गौतम भट (वय ३१ वर्षे )  असे या आरोपीच नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चेतन गौतम भट (३१) आणि पीयूष गौतम भट (२५ ) अशी हि दोन सख्खी भावंडांची नावेआहेत. शुक्रवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास मोबाईलवर गाणी वाजवण्यावरून दोन भावात भांडण झाले. यातच चेतनने पीयूषच्या पोटात चाकू भोसकला. पीयूषचा किंचाळण्याचा आवाज ऐकून विनोद मदतीसाठी धावले. त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. विनोद देविदास धनवानी (४१) रा. सिंधी कॉलनी, खामला यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तापस पोलिस करत आहे.