आज दिवसभरात अशा अनेक बातम्या मिळतील; सत्तार यांच्या राजीनाम्यावर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य

0
366

मुंबई,दि.४(पीसीबी) – आज दिवसभरात अशा अनेक बातम्या मिळतील, असं मोठं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. चंद्रकांत पाटील यातून काय सूचित करु पाहत आहेत, असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.

राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. कॅबिनेट मंत्रिपदाऐवजी राज्यमंत्रिपद मिळाल्याने ते नाराज होते. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं आहे

चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यामुळे अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना हाताशी घेऊन भाजपने चांगलाच धक्का दिला होता. त्यामुळे आणखी एखादं राजकीय नाट्य पाहायला मिळेल? असे संकेत मिळत आहेत.