शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्याचा कोणताही शब्द दिलेला नाही – भाजप

0
609

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – शिवसेना-भाजप युतीने विधानसभा निवडणूक एकत्र लढवली असली तरी शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्याचा कोणताही शब्द दिलेला नाही, असे भाजपचे महाराष्ट्र प्रभारी आणि पक्षाचे सरचिटणीस भूपेंद्र यादव यांनी  म्हटले आहे.  तसेच  शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस  निर्णय घेतील,  असेही यादव यांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीच्याआधी जागा वाटप आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षांतील कुरबुरी वाढल्या होत्या. त्यादृष्टीने भूपेंद्र यादव यांचे विधान महत्वपूर्ण मानले जात आहे.  एक्झिट पोलमध्ये  शिवसेना-भाजपा युतीला कल दिला आहे.  त्यामुळे  भाजप-शिवसेना युतीचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट  होत आहे.

२०१४ साली शिवसेना, भाजपा स्वतंत्रपणे निवडणूक लढले होते. त्यानंतर यावर्षी लोकसभा निवडणुकीच्यावेळी दोन्ही पक्षांची पुन्हा युती झाली. राज्याच्या हितासाठी आम्ही पुन्हा एकत्र आलो आहोत. विचारधारेसह आमच्या सर्व गोष्टी जुळतात. आम्हाला महाराष्ट्राच्या हिताची काळजी आहे, असेही यादव यांनी सांगितले.