शिवसेनेने अग्रलेख लिहिणे बंद करून सत्तेतून बाहेर पडावे; ओवेसींचा शिवसेनेला खोचक सल्ला

0
553

मुंबई, दि. २० (पीसीबी) – शिवसेनेने अग्रलेख लिहिणे बंद करावे आणि सत्तेतून बाहेर पडावे, असा खोचक सल्ला एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी शिवसेनेला दिला  आहे. शिवसेना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाबरते आणि आपली भीती लपवण्यासाठी त्यांनी संपादकीय लिहिण्याचा हा नवा मार्ग शोधून काढला आहे, असा टोला असदुद्दीन ओवेसी यांनी शिवसेनेला लगावला आहे.