शिवसेनेचे उपनेते डॉ. तानाजी सावंत यांना जीवे मारण्याची धमकी

0
1761

सोलापूर, दि. ३० (पीसीबी) – शिवसेनेचे उपनेते तथा आमदार डॉ. तानाजी सावंत यांना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत माढा पोलिस ठाण्यात त्यांचे भाऊ शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्रा शिवाजी सावंत यांनी अज्ञातांविरूध्द गुन्हा दाखल केला. प्रा. शिवाजी सावंत यांच्या माढा तालुक्यातील वाकाव येथील घरी पोस्टाद्वारे आलेल्या निनावी पत्रात म्हटले आहे, की पूर्व वैमनस्यातून काही अज्ञात लोकांनी प्रा. डॉ. तानाजी सावंत यांना ठार मारण्यासाठी योजना आखली आहे, असे सूचित पत्राद्वारे करण्यात आले आहे. या धमकीच्या पत्रावरून माढा पोलिसात सोलापूर जिल्हा शिवसेना समन्वयक प्रा. शिवाजीराव सावंत यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.