शिवसेना-काँग्रेसच्या पाठिंब्यावर कोल्हापूरात राष्ट्रवादीचा महापौर

0
391

कोल्हापूर,दि.१९(पीसीबी) – कोल्हापूरच्या महापौरपदाच्या निवडणुकीत महाशिवआघाडीचं सरकार आल्याचं चित्र आहे, कारण महापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अ‌ॅड. सुरमंजिरी लाटकर यांची निवड झाली आहे.लाटकर कोल्हापूरच्या ४९ व्या महापौर ठरल्या आहेत.

महापौर-उपमहापौर निवडीला शिवसेनेचे चार नगरसेवक अनुपस्थित होते. गेल्या चार वर्षांपासून महापालिकेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना व्हीप लागू करण्यात आला होता. तसेच सर्वांना सहलीसाठी बाहेर पाठवण्यात आलं होतं.

कोल्हापूर महापालिकेत शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांचा फाॅर्म्युला यशस्वी ठरला आहे. त्यामुळे राज्यातही महाशिवआघाडीचा फाॅर्म्युला यशस्वी ठरेल, असा विश्वास आमदार हसन मुश्रीम यांनी व्यक्त केला आहे.