शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी

0
527

कोल्हापूर,दि.८(पीसीबी) – गेल्यावर्षी बेळगाव येथील येळ्ळूर गावात महाराष्ट्र मैदानावर कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांना निमंत्रित करण्यात आलेले. त्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावून तेथील उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी कार्यक्रमामध्ये त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडून द्या, असे विधान केले होते. या विधानामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

बेळगावमध्ये संभाजी भिडे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. गेल्यावर्षी १३ एप्रिल २०१८ रोजी भिडे यांनी आचारसंहितेचा भंग केल्यामुळे त्यांच्यावर बेळगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आतापर्यंत सगळ्या सुनावणीला भिडे गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे.

या संदर्भातील पुढील सुनावणी ही २४ मार्च रोजी होणार आहे. यापूर्वीही संभाजी भिडे यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. तसेच, भीमा-कोरेगावर प्रकरणातही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.