शिरुरमध्ये आगीत होरपळून तिघांचा दुर्देवी मृत्यू

0
528

शिरुर, दि. २९ (पीसीबी) – घराला लागेल्या आगीत वडिल आणि मुलासह एका मुलीचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना आज (सोमवार) दुपारी साडेतीनच्या सुमारास शिरूर तालुक्यातील आमदाबाद गावातील भिल्ल वस्तीत घडली.  

लालू अनंता गावडे (वय ३४), दादू लालू गावडे (वय २) आणि प्रांजल अरुण पवार (वय २) असे मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गावडे कुटुंब हे शिरूर तालुक्यातील आमदाबाद गावातील भिल्ल वस्तीत राहतात. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास त्याच्या घराला अचानक आग लागली आणि वडिल लालू, मुलगा दादू आणि मुलगी प्रांजल या तिघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. आगीचे कारण अद्याप समजलेले नाही.  शिरुर पोलीस तपास करत आहेत.