शिक्षण समिती सभापती पदी मनिषा पवार यांची बिनविरोध निवड

0
689

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या  शिक्षण समिती सभापतीच्या पदासाठी मनिषा पवार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची  बिनविरोध निवड  करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली. 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समिती सभापतीची निवडणूक स्थायी समिती सभागृहात  अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली  झाली.  त्यावेळी  ही निवड जाहीर करण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, नगरसचिव उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, अण्णा बोदडे,  प्रशासन अधिकारी ज्योत्सना शिंदे, आदी उपस्थित होते.

शिक्षण समिती सभापती पदी मनिषा पवार यांची निवड झाल्यानंतर महापौर राहूल जाधव व पक्षनेते एकनाथ पवार यांनी  मनिषा पवार यांचे अभिनंदन केले.