शिक्षकाने सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करून गैरवर्तन

0
374
उस्मानाबाद, दि.९ (पीसीबी) – उस्मानाबाद शहरातील एका नामांकित शाळेतील शिक्षकाने सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करून गैरवर्तन केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संतप्त पालक आणि नागरिकांनी या शिक्षकाला शाळेतच चांगला चोप देऊन पोलीस ठाण्यात झोडपत नेले. उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहन संपत सुरवसे (वय ५० ) असे या आरोपी शिक्षकाचे नाव आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शिक्षक हा सहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीसोबत मागील काही दिवसांपासून अश्लील चाळे  करून गैरवर्तन करत होता. सोमवारी सकाळी मुलगी घरी रडत आल्यानंतर पालकांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, तिने शिक्षकाकडून केल्या जात असलेल्या किळसवाण्या प्रकाराची माहिती दिली. मागील अनेक दिवसांपासून मांडीवर घेऊन बसवणे, नको त्या ठिकाणी हात लावणे, अश्लील चाळे करून गैरवर्तन करणे असे प्रकार हा शिक्षक करीत असल्याचे मुलीने पालकांना सांगितले. त्यामुळे या शिक्षकाचा किळसवाणा चेहरा सर्वांसमोर आला. त्यानंतर मुलीचे पालक आणि नागरिकांनी जाब विचारण्यासाठी शाळा गाठली. शिक्षकाने उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांना पिटाळण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त पालक आणि नागरिकांनी या शिक्षकाला शाळेतच चांगला चोप देऊन पोलीस ठाण्यात झोडपत नेले. उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.