‘माझी सटकली तर तुझी वाट लागेल’ भर सभेत अजित पवारांनी सर्कल अधिकाऱ्यांना भरला दम

0
613
कर्जत, दि. ९ (पीसीबी) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत जामखेडमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात भर सभेत सर्कल अधिकाऱ्यांना दम भरला आहे.
सर्कल अधिकाऱ्यांना सांगतो माझी सटकली तर तुझी वाट लागेल, अशा शब्दात अजित पवारांनी दम भरला आहे. अजित पवार यांनी यावेळी नवा रस्ता बांधून झाल्यावर जर एका पावसात रस्ते खराब झाले, तर त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात येईल असे स्पष्ट सांगितले. तसेच कोणता अधिकारी चिरीमिरी मागत असेल तर त्याचे नाव मला सांगा, मी बघतो त्यांच्याकडे, अशी तंबीही अजित पवारांनी दिली.