शाळेत कमी गुण मिळाल्याने आई मुलीला रागावली : नंतर घडले असे काही

0
194

निगडी, दि. १३ (पीसीबी) – शाळेत कमी गुण मिळाल्याने आई मुलीला रागावली. त्यानंतर आईने मुलीला निगडी ते कात्रज या बसमध्ये बसवून दिले असता मुलगी बेपत्ता झाली. ही घटना 5 एप्रिल रोजी रात्री साडेसात वाजता अण्णाभाऊ साठे पीएमपीएमएल जंक्शन, निगडी येथे घडली.

याप्रकरणी 16 वर्षीय बेपत्ता मुलीच्या आईने मंगळवारी (दि. 12) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 16 वर्षीय मुलीला शाळेत कमी गुण मिळाले. त्यामुळे फिर्यादी या त्यांच्या मुलीला रागावल्या. त्यानंतर फिर्यादी यांनी त्यांच्या मुलीला भक्ती शक्ती चौक निगडी येथील अण्णाभाऊ साठे पीएमपीएमएल जंक्शन येथून निगडी-कात्रज या बसमध्ये बसवून दिले. त्यानंतर मुलगी कात्रज येथे गेली नाही. बस प्रवासादरम्यान तिला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.