शाळा महाविद्यालये सुरु, तर बंदला पाठींबा देण्यासाठी काळ्या फिती लावण्याचे आवाहन

0
350

मुंबई, दि.८ (पीसीबी) – केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात देशभरातील विविध कामगार संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. ‘बेरोजगारी हटवण्यासाठी सरकारने पावलं उचलावीत, किमान मजुरीचे दर निश्चित करावेत, कामगारांनी सामाजिक सुरक्षा मिळावी, तसेच कामगारांना २१ हजार रुपये एवढे किमान मासिक वेतन मिळावे,’ अशी मागणी या कामगार संघटनांनी केली आहे.

आज भारत बंद असला तरी राज्यातील शाळा-महाविद्यालयं सुरु राहतील. अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तसेच या बंदला पाठिंबा द्यायचाच असेल तर शिक्षक, प्राध्यापकांनी काळ्या फिती लावण्याचे आवाहन गायकवाड  यांनी केले आहे. त्यानंतर प्राध्यापक-शिक्षक आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी होणार आहेत.