मुंबई,दि.८(पीसीबी) – देशातील विद्यार्थी आपल्याच देशात असुरक्षित झाला आहे आणि अन्य देशांतील अल्पसंख्याकांना आपण संरक्षण द्यायला निघालो आहोत, असा सणसणीत टोला अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने सरकारला लगावला आहे. तिने यासंदर्भात ट्विट केलं आहे.
जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद देशभर उमटत आहेत. देशातील विविध शिक्षण संस्थामधील विद्यार्थी याविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या घटनेचा निषेध केला असून मराठी कलाकारही या विरोधात पुढे आले आहेत.
Can’t protect students in your own country and want to protect minorities from other countries!!!! #Irony #JNUViolence #jnuwewithyou
— Sonalee (@meSonalee) January 7, 2020
नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) देशात लागू करुन भाजप सरकार पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांमधील अल्पसंख्याकांना देशाचे नागरिकत्व देणार आहे. सरकारच्या याच भूमिकेवर बोट ठेवत सोनालीने जोरदार चपराक लगावली आहे.
दरम्यान, जेएनयूत झालेल्या प्रकारामुळे देशभरात वातावरण तापलं आहे. देशभर आंदोलनाचं सत्रं सुरु झालं आहे.