पुणे शहराला कोरोनाचा विळखा; दिवसभरात ९९ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ, तर सर्वाधिक १२ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू

0
459

पुणे, दि .8 (पीसीबी) :पुणे शहराला कोरोनाचा अक्षरशः विळखा पडला आहे. आज दिवसभरात ९९ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली, तर सर्वाधिक १२ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दिवसभरात ६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
विविध रुग्णालयात ७६ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील १२ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
पुण्यातील एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २२४५ आहे. त्यात डॉ. नायडू हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटलमध्ये १९६६ आणि ससून २७९ उपचार घेत आहेत.
पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या १३७७ आणि आजवर एकूण मृत्यू १३७ पर्यंत आहेत.