शहरात दुचाकी चोरांचा सुळसुळाट

0
386

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरात दुचाकी चोरांचा मोठा सुळसुळाट झाला आहे.
घराच्या पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी एका अल्पवयीन मुलाने चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 5) सायंकाळी प्राधिकरण, निगडी येथे घडली. आशिष भागचंद कर्नावट (वय 43, रा. पेठ क्रमांक 27, प्राधिकरण, निगडी) यांनी गुरुवारी (दि. 6) याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास एका 14 वर्षीय मुलाने घराच्या पार्किंगमध्ये ठेवलेली 21 हजारांची दुचाकी चोरून नेली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

टाटा कंपनीसमोरून गेली दुचाकी चोरीला
टाटा कंपनीच्या समोरील पदपथावर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 5) रात्री उघडकीस आली. आनंद हनुमंत चिवडे (वय 22, रा. आळंदीरोड, भोसरी) यांनी गुरुवारी (दि. 6) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास फिर्यादी चिवडे यांनी आपली 15 हजार रुपये किंमतीची (एमएच 14 डीएल 4113) ही दुचाकी चिखली येथील टाटा कंपनीच्या समोरील पदपथावर उभी केली होती. रात्री अकरा वाजताच्या सुमारास दुचाकी चोरीस गेल्याचे दिसून आले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

हॉस्पिटलबाहेर पार्क केलेली दुचाकी पळवली –
चिंचवड येथील गुंजकर हॉस्पिटल बाहेर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 7) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सुदाम दिलीप समगे (वय 21, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी गुरुवारी (दि. 6) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास फिर्यादी सुदाम यांनी आपली दहा हजार रुपये किंमतीची (एमएच 14 ईके 8037) ही दुचाकी शिवतेजनगर, चिंचवड येथील गुंजकर हॉस्पिटलच्या बाहेर उभी केली होती. सायंकाळी सात वाजताच्या सुमारास ते परत आले असता त्यांना दुचाकी चोरीस गेल्याचे दिसून आले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.