शहरातील ‘या’ परिसरात एकाच दिवशी ४ चोऱ्या; नागरिकांत घबराटीचे वातावरण

0
375

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – चाकण परिसरात दोन, पिंपरी आणि हिंजवडी परिसरात प्रयेकी एक चोरीची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये चोरट्यांनी दोन दुचाकी, बांधकाम साहित्य आणि वाहनाचे पार्ट असा एकूण एक लाख 12 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.

मनोज बाळासाहेब शेळके (वय 27, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरून चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 24) सकाळी उघडकीस आली.

शुभम संतोष चव्हाण (वय 21, रा. मोई, ता. खेड) यांनी देखील चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची 40 हजारांची दुचाकी त्यांच्या घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. हा प्रकार शनिवारी (दि. 25) सकाळी उघडकीस आला.

समीर मधुकर देवकर (वय 36, रा. हडपसर) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी फिनोलेक्स चौकातील गेराज इम्पिरिअम ओयासीस या व्यावसायिक इमारतीच्या बांधकाम साईटवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. 17 ऑक्टोबर रोजी पहाटे पाच ते साडेपाच वाजताच्या कालावधीत त्यांच्या बांधकाम साईटवरून तीन अनोळखी महिलांनी 35 हजारांचे बांधकामाचे साहित्य चोरून नेले.

आप्पाणा लक्ष्मण क्षत्रिय (वय 26, रा. डांगे चौक रोड, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवारी (दि. 25) मध्यरात्री बारा ते रात्री बारा वाजेच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या घरासमोर पार्क केलेल्या कारमधून ईसीएम कंट्रोल मोडीवेल बॉक्स आणि सीएनजी इंजेक्टर असे एकूण 22 हजारांचे पार्ट चोरून नेले.