अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचा-याचा मृत्यू

0
763

बालेवाडी, दि. २६ (पीसीबी) – अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात 17 नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता मुंबई-बेंगलोर महामार्गावर बालेवाडी येथे झाला.

मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटली नाही. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी सागर घोगरे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे 17 नोव्हेंबर रोजी नाईट ड्युटीस होते. ड्युटीवर असताना त्यांना समजले की, मुंबई-बेंगलोर महामार्गावर बालेवाडी येथे एक अपघात झाला आहे. एका अज्ञात वाहनाने पादचारी व्यक्तीला धडक दिली आहे. त्यानुसार फिर्यादी यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी व्यक्तीला पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा 7 डिसेंबर रोजी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे तपास करीत आहेत.