रस्त्याला आडवे लावलेलं बॅरिकेट काढले म्हणून कोयता घातला डोक्यात

0
823

मोशी, दि. २६ (पीसीबी) – रस्त्यावर बॅरीगेट लावून रस्ता अडवला. ते बॅरीगेट काढून एक तरुण जाण्याचा प्रयत्न करत असताना रस्ता अडवणा-या व्यक्तीने तरुणीला कोयत्याने वार करून जखमी केले. तसेच काठीने मारून पळून गेला. ही घटना शुक्रवारी (दि. 24) रात्री मोशी येथे घडली.

सचिन धनराज पवार (वय 28, रा. आदर्शनगर, मोशी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भूषण बहिरट (रा. गंधर्वनगरी, मोशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुक्रवारी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास दुचाकीवरून त्यांच्या घरी जात होते. मोशी येथील मैत्री दरबार हॉटेल येथे सेवा रस्त्यावर आरोपीने बॅरीगेट लावून रस्ता अडवला होता. फिर्यादी यांनी त्याला बॅरीगेट काढण्यात सांगितले. ‘तू इथून जायचे नाही’ असे आरोपीने म्हटले. त्यामुळे फिर्यादी स्वतः बॅरीगेट काढत असताना आरोपीने त्यांना शिवीगाळ, दमदाटी करून कोयत्याने डोक्यात, कानावर वार करून गंभीर दुखापत केली. शुभम अशोक आडवाणी, पावन अरविंद वाकुडे यांना देखील आरोपीने शिवीगाळ करून दमदाटी केली. फिर्यादी यांना काठीने मारून दुखापत केली. त्यानंतर आरोपी दुचाकीवरून पळून गेला. पोलीस उपनिरीक्षक अशोक तरंगे तपास करीत आहेत.