शरद पवार हे आपल्या सर्वांसाठी माऊंट एव्हरेस्ट – अजिंक्य रहाणे

0
688

पुणे,दि.२१(पीसीबी) – भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक केलं आहे. शरद पवार हे आपल्या सर्वांसाठी माऊंट एव्हरेस्ट आहेत, असं रहाणे म्हणाला आहे.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ अजिंक्य रहाणे याच्या हस्ते ठेवण्यात आला होता. यावेळी निगडी प्राधिकरणात बोलताना त्याने हे वक्तव्य केलं आहे. पवारांनी भारतीय क्रिकेटसाठी दिलेलं योगदान मोठं आहे, अशी भावना त्याने यावेळी व्यक्त केली.

माझ्या क्रिकेटची सुरुवात टेनिस बाॅल स्पर्धांच्या माध्यमातूनच झाली होती. क्रिकेटमध्ये करिअर करु पाहणाऱ्या सर्वांनी आपलं ध्येय सोडू नये, असा सल्ला रहाणेनं लहान क्रिकेट खेळाडूंना दिला आहे.