संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनव्दारा रक्तदान शिबीराचे आयोजन

0
494

भोसरी, दि.२१ (पीसीबी) – संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनव्दारा गुरूवार दि.२६ रोजी सकाळी ८ वाजता संत निरंकारी सत्संग भवन, दिघी रोड, भोसरी या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

संत निरंकारी मिशनमध्ये रक्तदानाची सुरूवात १९८६ पासून ते एप्रिल २०१९ आतापर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये २५ रक्तदान शिबीर संपन्न झाली आहेत. गेली तीस वर्षे भोसरी परिसरामध्ये स्वच्छता अभियान, वृक्षरोपण, रक्तदान शिबीर यांसारख्या सामाजिक कार्यामध्ये  मिशन  ‌अग्रेसर आहे. रक्तदानाच्या मुख्य दिवशी अधिकाधिक रक्तदात्यांना सहभागी करून घेण्याचे दृष्टीने गेले आठ दिवस संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन चे स्वयंसेवक, सेवादल भोसरी-दिघी परिसरात घरा-घरात जाऊन रक्तदानाचे तसेच संत निरंकारी मिशन च्या कार्याची माहिती देत आहेत. या महाशिबीरात भोसरीतील भव्य संख्येने उपस्थित राहून या मानवतेच्या कार्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन संत निरंकारी मिशन चे प्रमुख अंगद जाधव यांनी केले आहे.