शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

0
221

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. डॉक्टरांनीच शरद पवारांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता. ३१ ऑक्टोंबरपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यात आज ( ७ नोव्हेंबर ) शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

शरद पवार यांची प्रकृती ठिक नसल्याने ३१ ऑक्टोंबर रोजी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तीन दिवस उपचारानंतर शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार होता. परंतु, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने रुग्णालयातील मुक्काम वाढला होते. त्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

“दिवाळीत किमान ५० हजार लोकांना शरद भेटले होते. लोकांना भेटल्यामुळे, बोलल्यामुळे न्यूमोनियाचा संसर्ग झाला आहे. परंतु, त्यांची तब्येत ठीक असून, इच्छाशक्तीच्या बळावर ते लवकर बरे होतात. मोठ्या आजारांना त्यांनी हरवलं, न्युमोनिआ किरकोळ विषय आहे, असा विश्वास माजी आरोग्यामंत्री राजेश टोपे यांनी शरद पवारांना भेटल्यावर व्यक्त केला होता.

दरम्यान, रुग्णालयात उपचार सुरु असताना देखील शरद पवार यांनी शिर्डी येथील राष्ट्रवादीच्या शिबिराला हजेरी लावली होती. शरद पवार डॉक्टरांच्या पथकासह विशेष हेलिकॉप्टरने शिर्डी येथे पक्षाच्या शिबिरासाठी दाखल झाले होते. शिबिराच्या स्थळी दाखल झाल्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घोषणांत पवार यांचे स्वागत केलं. यावेळी शरद पवार यांनी पाच मिनिट कार्यकर्त्यांशी संवाद साधला होते. त्यानंतर माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पवार यांचं भाषण वाचून दाखवलं होतं.