शरद पवारांना सोडण्याचा गम नाही पण हुरहूर आहे – दिलीप सोपल

0
591

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते दिलीप सोपल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतमातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत तब्बल २३ वर्षांनी घरवापसी करत असल्याचे सांगत सोपल यांनी आनंद व्यक्त केला.

विधानसभेच्या तिकिटांचा विषय आला म्हणून सांगतो कार्यकर्त्यांनी, मित्रांनी मला हा निर्णय घेण्यास सांगितले म्हणून मी हा निर्णय घेतला. शिवसेनेकडून त्याच मतदार संघातून मी निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादीने दोनदा तिकीट नाकारले होते. तरी अपक्ष म्हणून निवडून आलो. सोबत होतो. शरद पवारांना सोडण्याचा गम नाही पण हुरहूर आहेअसे विधान सोपल यांनी केले आहे.

तसेच उद्धव ठाकरे यांनी देखील सोपल यांच्या घरवापसीवर प्रतिक्रिया दिली . ब्रेक के बादब्रेक के बाद असे प्रवेश होत आहेत. दिलीप आमचे जुने सहकारी आहेत. काही कारणास्तव ते गेले होते, आता पुन्हा मोठ्या ताकदीने ते सेनेत येत आहेत अशा शब्दात सोपल यांचे स्वागत केले .राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून दिलीप सोपल यांना ओळखले जाते . त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिलीप सोपल यांचा शिवसेना प्रवेश राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जाते .