शत्रुघ्न सिन्हा यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्याकडून जिनांची स्तुती

0
685

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी मोहम्मद अली जिनांबद्दल स्तुतीपर केलेले विधान ताजे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन यांनी  जिनाचे कौतुक केले आहे. त्यामुळे त्यांच्या टीका होऊ लागली आहे.

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत जिनांचे मोठे योगदान होते आणि जिना मुस्लिम होते म्हणूनच आज शत्रुघ्न सिन्हा यांच्या विधानावरून वाद निर्माण केला जात आहे. सिन्हा यांना देशद्रोही म्हटले जात आहे, अशा शब्दांत माजिद मेमन यांनी शत्रुघ्न सिन्हा यांची पाठराखण केली आहे.

मेमन यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. शहा यांनी एक गोष्ट  लक्षात घ्यावी की,  कालपर्यंत शत्रुघ्न सिन्हा भाजपमध्ये  होते. त्यांनी देशविरोधी विधान केले असे आपण म्हणत असाल, तर मग ही तुमचीच शिकवणी ठरत नाही का?, असा खोचक सवाल मेमन यांनी  शहा यांना केला.