व्यभिचार हा गुन्हा ठरवणारे कलम ४९७ रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

0
724

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – व्यभिचार हा गुन्हा ठरवणारे कलम ४९७ रद्द करण्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरूवार) दिला आहे. पती हा पत्नीचा मालक नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहेव्यभिचार हा गुन्हा ठरु शकत नाही. मात्र, जर एखाद्या व्यक्तीने जोडीदाराच्या विवाहबाह्य संबंधांमुळे आत्महत्या केली. तर ते आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा ठरतो, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

 

अनिवासी भारतीय असलेले जोसेफ शाइन यांनी वकील सुविदुत सुंदरम यांच्या मार्फत कलम ४९७ च्या वैधतेला आव्हान दिले होते. यात गुन्हेगारी दंडसंहिता कलम १९८() चाही समावेश आहे. व्यभिचारात केवळ पुरूषांनाच दोषी ठरवून शिक्षा केली जाते, याबाबत स्त्रियांचाही विचार समान पातळीवर करावा, अशी मागणी त्यांनी केली होती.

 

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने गुरुवारी या याचिकेवर निर्णय दिला. न्या. एम खानविलकर, न्या. आर एफ नरिमन, न्या. डी वाय चंद्रचूड, न्या. इंदू मल्होत्रा यांचा घटनापीठात समावेश होता. न्यायालयाने व्यभिचाराला गुन्हा ठरवणारे आयपीसीतील कलम ४९७ रद्द करण्याचा निर्णय दिला. व्यभिचार हा घटस्फोटासाठी कारण म्हणून गृहित धरता येईल, मात्र तो गुन्हा ठरत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.