चऱ्होली येथे ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या गणेशमूर्ती बाहेर काढून नदीपात्राची स्वच्छता

0
696

भोसरी, दि. २७ (पीसीबी) – भोसरीतील सहयाद्री फाऊंडेशन आणि वीर वाद्यपथक यांच्या संयुक्त विद्यामाने चऱ्होली (बुद्रुक) परिसरातील  इंद्रायणी नदी पात्रात विसर्जीत केलेल्या “प्लास्टर ऑफ पॅरिस”च्या  गणरायाच्या मुर्ती बाहेर काढून नदीपात्राची स्वच्छता करण्यात आली.

यावेळी मुबई महापौर केसरी अध्यक्ष अजय लांडगे, युवा नेते अमित लांडगे, मंगेश लांडे, स्वप्नील भोसले, अशिश लांडगे, अक्षय लांडगे, पल्लवी धुले, सुमित कुंभार, अनिकेत शिंदे यांच्यासह वीर वाद्य पथकाचे सर्व वादक उपस्थित होते.

रविवारी (दि. २३) राज्यभरासह पिंपरी-चिंचवड शहरातील गणरायाला भावापुर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. यावेळी विसर्जीत केलेल्या “प्लास्टर ऑफ पॅरिस”च्या  गणेश मुर्तीचे पाण्यात विघटन होत नसल्याने नदी पात्रातील जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असून ते मानवी जीवनास हानिकारक ठरते. याची दखल घेत सह्याद्री फाऊंडेशन  आणि वीर वाद्य पथक यांच्या संयुक्त विद्यमाने इंद्रायणी नदी पात्रात विसर्जीत केलेल्या “प्लास्टर ऑफ पॅरिस”च्या  गणरायाच्या मुर्ती बाहेर काढून नदीपात्राची स्वच्छता करण्यात आली.