विशाखापट्टणममध्ये जहाजाला आग; २९ कर्मचाऱ्यांच्या समुद्रात उड्या

0
691

विशाखापट्टणम, दि. १२ (पीसीबी) – आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथील समुद्र किनाऱ्याजवळ तटरक्षक दलाच्या एका जहाजाला आग लागली.  जहाजावर २९ कर्मचारी होते. त्यांनी जीव वाचवण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या. एक जण बेपत्ता आहे. ही घटना आज ( सोमवारी) सकाळी साडेअकरा वाजता घडली.

आग लागलेल्या जहाजाचे ऑफशोअर सपोर्ट  कोस्टल जॅग्वार असे नांव आहे. ही  आग लागताच तटरक्षक दलाने वेगाने बचावकार्य सुरू केले आहे.  या  आगीचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही.  तटरक्षक दलाच्या एका बेपत्ता जवानाचा शोध सुरू आहे.  बचावकार्याला सुरूवात करण्यात आली आहे.