“कुणी तरी येणार येणार गं..!”

0
287

मुंबई, दि.२७ (पीसीबी) : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी लवकरच एका छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विराट आणि अनुष्काने याची माहिती चाहत्यांना दिली.

“अॅण्ड देन, वी वेअर थ्री… अराईव्हिंग जानेवारी 2021,” असं लिहित विराट आणि अनुष्काने गुडन्यूज शेअर केली. यानंतर दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने डिसेंबर 2017 मध्ये इटलीमध्ये लग्न केलं होतं. विराट आणि अनुष्काची पहिली भेट एका शॅम्पूच्या जाहिरातीदरम्यान झाली होती. या भेटीचं रुपांतर आधी मैत्रीत नंतर प्रेमात झालं.