विधान परिषदेसाठी काँग्रेसमधून यांचे नाव निश्चित

0
433

मुंबई: विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ जागांची निवड लवकरच होणार आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातील उमेदवारांच्या नावावर आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊ शकते.

सत्यजित तांबे यांनी 2014 साली अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. तांबे यांनी दोन वेळा अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणूनही काम पाहिलं आहे. गेल्या दीड दशकांपासून तांबे यांनी युवक काँग्रेस आणि NSUIच्या माध्यमातून युवकांना संघटित करण्याचं काम केलं आहे. तसंच जयहिंद युवा मंचाद्वारे तांबे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. तांबे यांचे वडिल डॉ. सुधीर तांबे हे सुध्दा नाशिक पदवीधर मतदारसंधातून विधान परिषदेचे सदस्य आहेत. सत्यजित तांबे यांना संधी मिळाल्यास एकाच वेळी बाप-लेख विधान परिषद सभागृहात असतील.

एकनाथ खडसे यांचेही नाव चर्चेत –
दरम्यान, तांबे यांच्या शिवाय रजनी पटेल नसिम खान, सचिन सावंत यांचीही नावे चर्चेत आहेत. काँग्रेससोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील चार नावं समोर आली आहे. त्यात भाजपमधील नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचंही नाव चर्चेत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नावालाही पसंती मिळण्याची शक्यता आहे. तर गायक आनंद शिंदे आणि उत्तमराव जानकर यांची नावही चर्चेत आहेत.