मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याकडे न्याय मागण्यासाठी आलेल्या महिलेने पेट्रोल ओतून पेटवून घेतले

0
212

लखनौ, दि. १४ (पीसीबी) – घरगुती वादावर थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्याय मागण्यासाठी आलेल्या अंजली तिवारी नावाच्या महिलेने लखनौ मध्ये विधान भवनाजवळ स्वतःवर पेट्रोल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने ती बचावली, मात्र ९० टक्के भाजली आहे. तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

अंजलीचा २०१४ अखिलेश तिवारी याच्या बरोबर विवाह झाला होता. चार वर्षे दोघांचा संसार सुखात सुरू होता. नंतर वाद होऊ लागले आणि ते विभक्त झाले. नंतर असिफ नामक व्यक्तीबरोबर तीचे सूज जमले. धर्मांतर करून आयेशा नाव स्विकारुन तिने असिफ बरोबर संसार थाटला. पुढे तो सौदी अरेबियात नोकरीसाठी गेला. त्याकाळात तीने असिफ याच्या घरच्यांबरोबर राहण्याची इच्छा व्यक्त केली, पण त्यांनी नकार दिला. अखेर तिने पोलिस ठाणे गाठले मात्र पोलिसांनीही तिची दखल घेतली नाही. वैतागून थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आपले गाऱ्हाणे सांगण्यासाठी ती आली होती, पण तिला संधी मिळाली नाही. अखेर वैतागून तिने स्वतःवर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला.

उत्तर प्रदेश मध्ये महिला अत्याचाराच्या घटना रोज वाढत आहेत. हाथरस नंतर रोज सरासरी एक बलात्काराची घटना नोंदली जात आहे. पोलिसांचा बिलकूल वचक नसल्याने गुंडागर्दी वाढली आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ सरकार विरोधात जनमत वाढते आहे.