विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक नाही – अशोक चव्हाण

0
797

नांदेड, दि. ४ (पीसीबी) –  आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पक्षाची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. तसेच पक्षाकडे उमेदवारीदेखील मागितलेली  नाही. परंतु पक्षाने आदेश दिला,  तर निवडणूक लढवेन, असे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

काँग्रेसकडून नांदेड जिल्ह्यातील विधानसभा लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या   मुलाखती झाल्या.  माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हेदेखील मुलाखतींच्या दोन्ही दिवशी व्यासपीठावर उपस्थित होते.  अशोक चव्हाण यांच्या पारंपरिक भोकर मतदार संघासाठी मुलाखतीचा कार्यक्रम झाला. परंतु अशोक चव्हाण यांनी मात्र मुलाखत दिलेली नाही.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत चव्हाण यांचा   पराभव झाला आहे. तर भोकर मतदारसंघात चव्हाणांना मोठा फटका बसला. त्यामुळे विधानसभा लढवण्यास इच्छुक नसणारे अशोक चव्हाण आगामी निवडणूक लढवणार की नाही याबाबत उलटसुलट  चर्चा  सुरू झाल्या  आहेत.  अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण या भोकर विधानसभेच्या आमदार आहेत.