विधानसभा निवडणुकीत महायुती २२९ जागा जिंकेल

0
449

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती  २२९  जागा  जिंकेल, असा अंदाज   भारतीय जनता पक्षाने केलेल्या  एक सर्वेक्षणात वर्तविण्यात आला आहे. या सर्वेक्षणामुळे युतीमध्ये  आनंदाचे वातावरण पसरले असून युतीच्या जगावाटपावर तोडगा काढण्यासाठी  बैठक बोलविण्यात येणार  आहे.

शिवसेना – भाजप  विधानसभा निवडणूक युतीतून  लढणार का?  याचीच चर्चा सुरू असताना विधानसभेत युतीला अभूतपूर्व यश मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.  सध्या संख्याबळानुसार महायुती आणि अपक्ष मिळून  १८३ जागांचे बहुमत आहे. सर्वेक्षणानुसार त्यात आणखी ४० ते ५० जागांची भर पडण्याची शक्यता आहे. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादी फक्त ५० ते ६० जागांपर्यंत सीमित राहण्याची शक्यता  आहे.

भाजपने महायुती होणार, हे गृहीत धरून सर्व्हे केलेला आहे. याचाच अर्थ युती करून निवडणूक लढवण्याची भाजपची भूमिका स्पष्ट होत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या जागावाटपाच्या बैठकींना वेग येणार आहे. १३ सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी  आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.