विद्युत रोहित्र खाली पाडून एवढ्या किमतीच्या तांब्याच्या तारा चोरल्या; ऑईल सुद्धा सांडले

0
481

आळंदी, दि. २३ (पीसीबी) – अज्ञात चोरट्यांनी महावितरणच्या इलेक्ट्रिक पोलवरील विद्युत रोहित्र खाली पाडला. त्यातील ऑईल सांडून 40 हजारांच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्या. ही घटना रविवारी (दि. 21) सकाळी शेल पिंपळगाव येथे उघडकीस आली.

तानाजी अच्युतराव सरवदे (वय 32, रा. शेल पिंपळगाव) यांनी याबबात चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेल पिंपळगाव येथे अज्ञात चोरट्यांनी इलेक्ट्रिक पोलवरील विद्युत रोहित्र खाली पाडले. त्याचे नट बोल्ट खोलून रोहीत्रामधील 20 हजारांचे ऑईल सांडून त्याचे नुकसान केले. त्यानंतर रोहीत्रामधील 40 हजारांच्या तांब्याच्या तारा चोरट्यांनी चोरून नेल्या. हा प्रकार शनिवारी रात्री दहा ते रविवारी सकाळी आठ वाजताच्या कालावधीत घडला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.