विद्या भारती परिचय पत्रक व माहितीपट इ-अनावरण समारंभ उत्साहात

0
301

पुणे, दि. २३ (पीसीबी) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक प.पू. डॉ. हेडगेवार यांची पुण्यतिथी व जागतिक योग दिनाचे औचित्य साधून विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान, पश्चिम महाराष्ट्र प्रांतच्या प्रचार विभागाच्या विद्या भारती परिचय पत्रक व माहितीपटीचे इ-अनावरण करण्यात आले. यावेळी विद्या भारती संस्थानचे राष्ट्रीय मंत्री अवनीशजी भटनागर प्रमुख वक्त म्हणून उपस्थित होते.

यावेळी बोलताना भटनागर यांनी प्रभावी भारतीय शिक्षण प्रणालीतील योग, संगीत, संस्कृत , नैतिक आणि शारीरिक शिक्षण या पाच आधारभूत घटकांची शैक्षणिक क्षेत्रातील आवश्यकता स्पष्ट केली. विद्या भारतीमध्ये प्रचार विभागाचे महत्त्व विद करताना, भारतीय संस्कृतीवर हल्ला करणाऱ्या विचारसरणींपासून सावध राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास क्षेत्राचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत पांडे, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष अनिल महाजन, कार्यवाह मोहन कुलकर्णी, सहकार्यवाह प्राचार्य डॉ. अरूण कुलकर्णी , सहमंत्री रघुनाथ देवीकर, प्रांत प्रचार प्रमुख राजन वडके तसेच जिल्हानिहाय पदधिकारी उपस्थित होते. स्वागत व परिचय रघुनाथ देवीकर यांनी केले. राजन वडके यांनी प्रचार विभागाच्या कामाचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह प्रचार प्रमुख अमेय पोळेकर यांनी केले.