ती म्हणते, सुशांत माझ्या स्वप्नात आला होता आणि…

0
329

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – वादग्रस्त अभिनेत्री नृत्यांगना राखी सावंत नेहमी प्रमाणे नेटिझन्सकडून जाम ट्रोल झाली आहे. आत्महत्या केलेला अभिनेता सुशांत सिंह राजपूत माझ्या स्वप्नात आला होता, तुझा मुलगा म्हणून मी पुढचा जन्म घेईल, असे विधान असलेला राखी सावंतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावर सुशांतच्या चाहत्यांनी तुफानी टीकेची झोड उठवली आहे.

राखी सावंतचा या व्हिडीओमुळे त्याचे चाहते दुखावले आहेत. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात वेगवेगळे मतप्रवाह आहेत.त्याच्या जुन्या मैत्रिंनींचे जाबजबाब सुरू आहेत. सुशांतला कोणी किती त्रास दिली. फिल्म जगतात तो किती स्ट्रगल करत होता, सलमान खआन, कऱण जोहर यांनी त्याला कसे डावलले अशा अनेक मुद्यांवर बातम्या झळकत आहेत. सुशांतच्या कुटुंबाला त्याच्या आत्महत्येने मोठा धक्का बसला आहे. त्यातून ते अद्याप सावरत नाहीत तोच राखी सावंत ने वेळकाळाचे भान न ठेवता हा व्हिडिओ टाकल्याने नेटिझन्समध्ये संतापाची लाट आली आहे. १४ जून रोजी झालेल्या सुशांतच्या आत्महत्येबद्दल मुंबई पोलिस सर्व बाजुंनी तपास करत आहेत.