विठ्ठलनगरमध्ये एकाला भांडणे मिटवण्यासाठी बोलवून केली दगडाने मारहाण; कारचीही केली तोडफोड

0
482

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – भांडणे मिटवण्यासाठी बोलवून एकाला दोघांनी मिळून दगडाने मारहाण केली. तसेच त्याच्या कारचीही तोडफोड केली. ही घटना शनिवारी (दि.२३) सायंकाळी साडेचारच्या सुमारास वाळके चौक विठ्ठलनगर येथे घडली.

बाबासाहेब काळुराम जाधव (वय २७, रा. ओम सुपर मार्केटसमोर, बालाजीनगर, भोसरी) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आकाश बळीराम खळगे (वय २५, रा. बालाजीनगर, भोसरी) आणि अमोल गोपीनाथ पंडीत (वय ३०, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाबासाहेब यांची आरोपी आकाश आणि अमोल या दोघांसोबत किरकोळ कारणावरुन भांडण झाले होते. हे भांडण मिटवण्यासाठी आकाश आणि अमोल या दोघांनी बाबासाहेब यांना शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास विठ्ठलनगर येथील वाळके चौकात बोलवून घेतले. बाबासाहेब तेथे त्यांच्या कारमध्ये पोहचले. यावेळी मांडणे मिटवण्या ऐवजी आरोपींनी बाबासाहेबांना दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच त्यांची कार (क्र. एमएच/१७/एच/६४३८) तोडफोड केली. याप्रकरणी आकाश आणि अमोल या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस हवालदार झांजरे तपास करत आहेत.