विजयानंतर राम शिंदेंनी बांधला रोहित पवारला फेटा

0
520

अहमदनगर, दि. २४ (पीसीबी) – राजकारणात जय-पराजय हा होत असतो. सध्या राजकारणातील खिलाडीवृत्ती लुप्त  होऊ लागली आहे. पण याला छेद देत राष्ट्रवादीचे  अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी विजयानंतर  भाजपचे मंत्री राम शिंदे यांची घरी जाऊन त्यांच्या आईंचे आशिर्वाद घेतले आहेत. या कृतीमुळे सर्वसामान्य जनतेची रोहित पवार यांनी मने जिंकली आहेत.

कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजपचे मंत्री राम शिंदे यांचा तब्बल ४३,३४७ मतांनी रोहित पवारांनी पराभव केला आहे.

विजयानंतर रोहित पवार यांनी सायंकाळी चौंडी येथे येऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. त्यानंतर पालकमंत्री राम शिंदेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी राम शिंदे यांनी रोहित पवार यांचे अभिनंदन करत फेटा बांधून सत्कार केला.