वाल्हेकरवाडीत बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
506

चिंचवड,दि. ९ (पीसीबी) – ऑफीसचे काम आटपून दुचाकीवरुन घरी निघालेल्या एकाचा भरधाव बसने दिलेल्या जोरदार धडकेत मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.८) रात्री बाराच्या सुमारास वाल्हेकरवाडी चिंचवड येथील गुरुकृपा प्रिंटर्स समोरील रस्त्यावर घडली.

शंकर बाळासो बोंगार्डे असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी आनंदा दादु मांगले यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बसचालक भगवान बन्सीलाल पाटील (वय ४३, रा. शिवनगरी, बिजलीनगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री बाराच्या सुमारास शंकर हे त्यांच्या वाकड येथील ऑफीसचे काम आटपून दुचाकी (क्र.एमएच/१४/सीई/२५९४) वरुन घराकडे निघाले होते. यावेळी बसचालक भगवान याने त्याच्या ताब्यातील बस (क्र. एमएच/१४/जीडी/६७६५) ही भरधाव वेगाने चालवून शंकर याच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यामध्ये शंकर याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. बसचालक भगवान याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक कांबळे तपास करत आहेत.