वाल्हेकरवाडीतील श्री साई हौसिंग सोसायटी रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी

0
817

चिंचवड, दि. २८ (पीसीबी) – वाल्हेकरवाडी गुरूद्वारा रोड येथील श्री साई हौसिंग सोसायटी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे सचिव गणेश बाबर यांनी आमदार लक्ष्मण जगताप व नगरसेविका संगीता भोंडवे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात बाबर यांनी आमदार जगताप व नगरसेविका भोंडवे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “श्री साई हौसिंग सोसायटीतून जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. केबल, नळजोड किंवा इतर कारणांसाठी केलेल्या खोदकामाने या रस्त्याचे डांबरीकरण पूर्णपणे उखडून गेले आहे. नागरिकांना या रस्त्यावरून जाताना कसरत करावी लागते. परिणामी अपघात होण्याचा धोका वाढला आहे. या सर्व बाबींची दखल घेत लोकप्रतिनिधी म्हणून आपण या प्रश्नात लक्ष घालून श्री साई हौसिंग सोसायटीतून जाणाऱ्या रस्त्याचे लवकरात लवकर डांबरीकरण करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या निवेदनावर सोसायटीमधील नागरिक विठ्ठल रांजने, सुनिल पाटोळे, कमलाकर शिंदे, चंद्रशेखर तावरे, राजेंद्र जगदाळे, सयाजीराव जाधव यांच्या सह्या आहेत.