वाणी समाज प्रबोधन संस्थेतर्फे रविवारी रहाटणीत बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन

0
740

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – अखिल महाराष्ट्र वाणी समाज प्रबोधन संस्था पिंपरी-चिंचवड महानगर आणि महिला मंडळ व युवा मंडळ पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांना रविवारी (दि. २८) बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे. रहाटणी येथील थोपटे लॉन्समध्ये सायंकाळी साडेचार वाजता हा कार्यक्रम होईल.

मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोतापल्ले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, सेवा विकास बँकेचे चेअरमन अमर मूलचंदानी, १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार पवन शहा, संमोहन तज्ज्ञ डॉ. विष्णू माने, अखिल महाराष्ट्र वाणी समाज प्रबोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील नेरकर, संस्थेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश शिरुडे, सेवा विकास बँकेचे संचालक चंद्रशेखर आहेरराव, राजू सावंत, प्रबोधन संस्थेचे राष्ट्रीय संघटक दीपक येवले, शहराध्यक्ष किरण अमृतकर, महिला शहराध्यक्षा भारती दशपुते, पिंपरी चिंचवड युवा अध्यक्ष स्वप्निल पाचपुते आदी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाला समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रबोधन संस्थेचे प्रवक्ते प्रा. उदय पाटकर यांनी केले आहे.