वाकडमध्ये जमाव बंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने १६ जणांविरोधात गुन्हा

0
632

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी दिलेल्या जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन करुन जमाव जमवत वाढदिवस साजरा केला. तसेच मोठमोठ्याने आरडाओरड करुन फटाके वाजवून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याने १६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वाकड पोलिसांनी शुक्रवार (दि.२२) रात्री सव्वादहाच्या सुमारास वाकड येथील प्रथम सोसायटीमध्ये केली.

त्यानुसार, धनराज बिरदा (रा. बंगलो नं.९९, प्रथम सोसायटी वाकड) तसेच त्यांच्यासोबत असलेले १५ जणांविरोधात आदेशाचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या लोकसभा निवडणुक असल्याने सर्वत्र आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे निवडणुक शांततेत आणि सुरळीत पार पडावी म्हणुन पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी शहर परिसरात जमाव बंदीचा आदेश लागून केला आहे. मात्र या आदेशाचा भंग करुन आरोपी धनराज आणि त्यांच्या १५ मित्रांनी प्रथम सोसायटी वाकड येथील सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस साजरा करुन आरडाओरड करत फटाके फोडले. यामुळे आयुक्तांच्या आदेशाचा भंग झाल्याने या सर्वांवर कलम ४२८/२०१९, ३६८,१४३,१४७ आणि १४१ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक स्वामी तपास करत आहेत.