चाकणमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

0
728

चाकण, दि. २४ (पीसीबी) – सासरच्या जाचाला कंटाळुन एका २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवार (दि.२१) दुपारी साडेतीन ते साडेपाचच्या दरम्यान चाकणजवळील संतोषनगर भाम वाकी येथे घडली.

कोमल प्रशांत बोंबले (वय २५, रा. संतोषनगर. भाम वाकी, ता. खेंड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी संतोष राजाराम बोरकर (वय ४७, रा. साईनगर हनुमान टेकडी,गोरेगाव पुर्व मुंबई) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती प्रशांत बापु बोंबले (रा. संतोषनगर भाम), सासरे बापु भिकाजी बोंबले आणि प्रतिक भिकाजी बोंबले (दोघे, रा. वेताळे, खेड) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल ही सासरी नांदत असताना आरोपी पती प्रशांत सासरे बापु आणि प्रतीक हे तिघे वारंवार कोणत्याना कोणत्या कारणावरुन तिच्यासोबत भांडण करायचे. तसेच तिला टोमणे मारुन शिवीगाळ करायचे. यामुळे तिची मानसिक स्थिती बिघडली होती. या त्रासाला कंटाळुन गुरुवार (दि.२१) दुपारी साडेतीन ते साडेपाचच्या दरम्यान कोमलने संतोषनगर येथील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी पती प्रशांत, सासरे बापु आणि प्रतिक या तिघांविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक पासलकर तपास करत आहेत.