वाकडमधील कस्पटेवस्ती ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन दिमाखात साजरा

0
743

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – वाकड, कस्पटेवस्ती येथील ज्येष्ठ नागरिक संघाचा पाचवा वर्धापनदिन रविवारी (दि. २७) दिमाखात साजरा करण्यात आला.

हॉटेल अॅम्बियन्समध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक संदीप कस्पटे होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, माजी नगरसेवक धनराज बिर्दा आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ३१ ज्येष्ठांचा तसेच विवाहाला ५० वर्षे पूर्ण झालेल्या सात ज्येष्ठ दाम्पत्यांचा खासदार बारणे व डॉ. देखणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाच्या अनेक सभासदांनी विविध रंगतदार कार्यक्रम सादर केले. संघाच्या स्मरणिकेचे खासदार बारणे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. डॉ. देखणे यांचे आनंद यात्री या विषयावर व्याख्यान झाले.

कार्यक्रमासाठी संघाचे अध्यक्ष अरूण कस्पटे, उपाध्यक्ष प्रकाश कुकडोलकर, सचिव राम लाभे, सहसचिव अरूण देशमुख, खजिनदार डमकडे, कार्यकारी मंडळाचे सभासद आशा शास्त्री, अरूणा लकडे, नाना पाटील, संदिप आप्पा युवा मंचचे प्रसाद कस्पटे, विनायक पाटील यांनी परिश्रम घेतले.